Posts

Showing posts from November, 2017

पायाखालचं गाव

Image
*पायाखालचं गाव* मराठी भाषा, मराठी व्याकरण याची गोडी मला अगदी शालेय वयापासुन. आमचे वडील किर्तनकार, भागवत धर्माची पताका खांद्यावर मिरविणारे शिलेदार त्यामुळे घरात आपसुक संत साहित्याची ग्रंथसंपदा, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, एकनाथ महाराजांचं भागवत व ईतर अनेक संताची लेखनसंपदा. वडिलांनी कधीच हाता कानाला पकडून शिकवलं नाही परंतु कळत-नकळत या गोष्टी मनाच्या गाभाऱ्यात झिरपत गेल्या. माझ्याइतकं किर्तनं नक्कीच कोणी ऐकलेली नसतील. शालेय पाठ्य पुस्तकात असणारं मराठीचं पुस्तक फार आवडायचं विषेशतः पहिल्या पानावर असणारा लेखकाचा फोटो व त्यांची माहिती मनाला भुरळ घालायची शिवाय मराठी विषय शिकविण्यासाठी लाभलेली शिक्षक मंडळी देखील उच्च प्रतीची होती. ष आणि श चा उच्चार कसा करायचा किंवा ण आणि न याविषयी काटेकोर असणारे कुलकर्णी सर अथवा एका लयीत कविता म्हणणारे कोटलवार सर असोत. पुढे दहावी नंतर माझ्या शिक्षणाचा प्रवाह बदलला आणि अभ्यासक्रमातुन मराठी हा विषय गायब झाला मात्र वाचणाची सवय तसुबरदेखील कमी झाली नाही. सुरुवातीच्या काळात व्रतपत्र वाचण एवढच मर्यादित होतं पुढे ते मासिक वाचनापर्यंत आलं. लोकसत्ता, चित्र...

दातदुखी....

Image
दातदुखी .... * मोफत दंतचिकीत्सा * अशी जर तुम्ही कोठे पाटी किंवा जाहिरात वाचली असेलतर अजिबात जाऊ नका कारण या जाहिरातीचा आणि उपचाराचा काहीच संबंध नसतो. आज सकाळीच पेपरात ही जाहिरात वाचली व मी गालातल्या गालात हसलो नेमके याच वेळेस आमच्या सौ.चे आमच्याकडे लक्ष गेले व नेहमीप्रमाणे ही हाताबाहेरची केस आहे हे आमच्या विषयीचे तीचे मत ठाम झाले. परंतु हीच जाहिरात पाहुन आम्हाला सात-आठ वर्षापुर्वीची घटना आठवली. सकाळी सकाळी घरी येणार्या वर्तमानपत्राच्या गठ्ठयात एक पाम्पलेट आले व त्यावर * मोफत दात तपासले जातील * असे लिहीले होते..झाले या सुवर्णसंधीचे सोने करण्याचा अट्टाहास आमच्या सौ.ने केला कारण नेमके त्याचवेळी आमच्या लहान मुलीचा वय वर्ष पाच-सहा दात किडलेला होता. फुकट आहे म्हटल्यानंतर त्याचा फायदा घेऊ व संसारात आपण कसे व्यवहारीक आहोत हे दाखवून देउ याचा चंगच जनु तीने बांधलेला होता याच विचाराने तिने आमचा पिच्छा पुरविला. सुरवातीला आम्ही या हट्टाकडे कानाडोळा केला कारण सौ.जरी आम्हाला ढ समजत असलीतरी आम्ही स्वतःला हुशार समजतो.सगळ्यातलं सगळच फक्त आम्हालाच समजते हा आमचा दावा आहे. आम्ही आमच्यापरीने सौ.ला समजाव...
Image
*मित्रांनो*..... *रामराम* उद्या ८ नोव्हेंबर, बरोबर एक वर्षापूर्वी देशात नोटबंदीचा निर्णय झाला आणि दुसर्या दिवसांपासून ची अवस्था फारच मनोरंजक व गंमतशीर होती. पैसे असणारे व नसणारे दोन्ही वर्ग परेशान होती  बँकसमोर व एटीमसमोर हे रांगाच्या रांगा. बर्याच लोकांची तर रांगा लावणे हीच एक दिनचर्या झाली होती. त्या काळातल्या अनेक गमतीजमती सांगता येतील मात्र आजचा तो विषय नाही नोटबंदीच्या दोन-तीन दिवसानंतर मी कंपनी कामानिमित्त चाकणला निघालो. धायरीतुन आमची दुचाकी सिंहगडरोड-राजाराम पुल-कर्वे रोड-भांडारकर रोड-फर्गुसन रोड करतकरत वाकडेवाडीच्या पुलाखालून जुना मुंबई हायवेला लागली. नाशिक फाट्यावरुन भोसरी, मोशी करत आम्ही दिमाखात निघालो होतो. तंबाखु खाऊन आपल्या दुचाकीवरून मागच्याचा विचार न करता पिचकारी मारणारे महाभाग, विरुद्ध दिशेने बेदरकारपणे आपली वहाणे दामटणारी शुरवीर, सिग्नल तोडणे हेच आपले कार्य आहे असे माननारा आदरणीय वर्ग..एक ना अनेक गोष्टी न्याहाळीत आम्ही चाकणाचा चौक केव्हा पार केला ते आमचे आम्हालाच समजले नाही. चाकण- महाळुंगे रस्त्यावर इले्क्ट्रो मेक कंपनीच्या पुढे आमची गाडी गेली आणि आमच्या स्प्...