पायाखालचं गाव

Image
*पायाखालचं गाव* मराठी भाषा, मराठी व्याकरण याची गोडी मला अगदी शालेय वयापासुन. आमचे वडील किर्तनकार, भागवत धर्माची पताका खांद्यावर मिरविणारे शिलेदार त्यामुळे घरात आपसुक संत साहित्याची ग्रंथसंपदा, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, एकनाथ महाराजांचं भागवत व ईतर अनेक संताची लेखनसंपदा. वडिलांनी कधीच हाता कानाला पकडून शिकवलं नाही परंतु कळत-नकळत या गोष्टी मनाच्या गाभाऱ्यात झिरपत गेल्या. माझ्याइतकं किर्तनं नक्कीच कोणी ऐकलेली नसतील. शालेय पाठ्य पुस्तकात असणारं मराठीचं पुस्तक फार आवडायचं विषेशतः पहिल्या पानावर असणारा लेखकाचा फोटो व त्यांची माहिती मनाला भुरळ घालायची शिवाय मराठी विषय शिकविण्यासाठी लाभलेली शिक्षक मंडळी देखील उच्च प्रतीची होती. ष आणि श चा उच्चार कसा करायचा किंवा ण आणि न याविषयी काटेकोर असणारे कुलकर्णी सर अथवा एका लयीत कविता म्हणणारे कोटलवार सर असोत. पुढे दहावी नंतर माझ्या शिक्षणाचा प्रवाह बदलला आणि अभ्यासक्रमातुन मराठी हा विषय गायब झाला मात्र वाचणाची सवय तसुबरदेखील कमी झाली नाही. सुरुवातीच्या काळात व्रतपत्र वाचण एवढच मर्यादित होतं पुढे ते मासिक वाचनापर्यंत आलं. लोकसत्ता, चित्र...

दातदुखी....

दातदुखी....
*मोफत दंतचिकीत्सा* अशी जर तुम्ही कोठे पाटी किंवा जाहिरात वाचली असेलतर अजिबात जाऊ नका कारण या जाहिरातीचा आणि उपचाराचा काहीच संबंध नसतो. आज सकाळीच पेपरात ही जाहिरात वाचली व मी गालातल्या गालात हसलो नेमके याच वेळेस आमच्या सौ.चे आमच्याकडे लक्ष गेले व नेहमीप्रमाणे ही हाताबाहेरची केस आहे हे आमच्या विषयीचे तीचे मत ठाम झाले. परंतु हीच जाहिरात पाहुन आम्हाला सात-आठ वर्षापुर्वीची घटना आठवली.
सकाळी सकाळी घरी येणार्या वर्तमानपत्राच्या गठ्ठयात एक पाम्पलेट आले व त्यावर *मोफत दात तपासले जातील* असे लिहीले होते..झाले या सुवर्णसंधीचे सोने करण्याचा अट्टाहास आमच्या सौ.ने केला कारण नेमके त्याचवेळी आमच्या लहान मुलीचा वय वर्ष पाच-सहा दात किडलेला होता. फुकट आहे म्हटल्यानंतर त्याचा फायदा घेऊ व संसारात आपण कसे व्यवहारीक आहोत हे दाखवून देउ याचा चंगच जनु तीने बांधलेला होता याच विचाराने तिने आमचा पिच्छा पुरविला. सुरवातीला आम्ही या हट्टाकडे कानाडोळा केला कारण सौ.जरी आम्हाला ढ समजत असलीतरी आम्ही स्वतःला हुशार समजतो.सगळ्यातलं सगळच फक्त आम्हालाच समजते हा आमचा दावा आहे. आम्ही आमच्यापरीने सौ.ला समजाविण्याचा पोकळ प्रयत्न केला,"अशा जाहिरातीचा काही संबंध नसतो, दाताच्या ईलाजासाठी जेवढा खर्च यायचा असतो तेवढाच येतो शिवाय मुलीचा दुधाचा दात असेल आपोआप पडुन जाईल" आमचा फुकटाचा सल्ला ऐकेल तर ती आमची बायको कसली ?? तुम्हाला व्यवहारच कळत नाही पासुन ते मुलींची काळजीच नाही?? इथपर्यंत तिने मला फैलावर घेण्यास सुरवात केली. एवढ्यावरच ती थांबली नाही..पाहुण्यांना, जवळच्या नातेवाईंकाना तीचे फोन सुरु झाले" फुकट दाताची तपासणी आहे मात्र आमच्या यांना काहीच कळत नाही, फक्त पैसे खर्चनच ठाउक आहे...एक ना बारा भानागडी..बरं या तिच्या फोनाफोनीत ज्याची जाहिरात होती तो आमचा पाहुणाच निघाला आता मात्र माझा नाईलाज झाला व ठरलेल्या वेळी आमची स्वारी लटांबरासहीत *मोफत दंतचिकीत्सेसाठी* तथाकथित दवाखान्यात पोंहचली. बरं या दाताच्या दवाखान्याचं गुढच असतं. अंधार, शांतता, नाव नोंदणी सर्व काही पोटात गोळा येण्यासारखं..आम्हाला तर हे दवाखाने आठ दिवस उपाशी असणार्या वाघासारखीच भासतात.शिकार समोर आली की पडा तुटुन..
या विचाराच्या काहुरातच आम्ही नाव नोंदणी वैगेरे केले व रांगेत बसलो. फुकटाच्या नादात अनेक दातदुखीवीर रांगेत होतीच. थोड्या वेळानंतर आमचा नंबर आला व केबिनमध्ये शिरलो. केबिनचं वातावरणतर आणखिन खतरनाक, ती पेंशटची खुर्ची, लाईट, हत्यारं आणि डॉक्टरचा चेहरा सगळं कसं धीरगंभीर... नमस्कार करुन मी ओळख सांगीतली, कोठुन पाहुने लागतात याचा संदर्भ दिला. बळेबळे हसुन त्यानी प्रतिसाद देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला खरे तर याच्याशी त्याना काहीच देणेघेणे नव्हते. औपचारिक हसुन त्यांनी मुलीची तपासणी सुरु केली, तोंड उघडण्यास सांगीतले समस्या खुपच गंभीर असल्यासारखे भाव चेहर्यावर आणले व दात पाडावा लागेल असे सांगीतले *त्यासाठी रु.४५०/-* एवढा खर्च येईल असे सांगीतले. आता मात्र आमच्या बायकोचा चेहरा पहाण्यासारखा होता तर आमचा प्रफुल्लित कारण पैशापेक्षा आम्ही कसे खरे आहोत, हे आज सिध्द होणार होते. चढलेल्या खुर्चीवरुन खाली उतरण्याचा प्रश्नच नव्हता आम्ही आमचा होकार दर्शविला व डॉक्टरसाहेबांनी दोन सेंकदात पकडीत पकडून किडलेला दुधाचा दात..दात कसला तुकडाच बाहेर काढला. ईतक्यात आमची मुलगी ओरडली "बाबा, हा दुसर्या बाजुचासुध्दा दुखतो" मी डोळ्याच्या धाकानेच तीला गप्प बसण्यास सांगीतले कारण अजुन ४५०/- रु. मला द्यायचे नव्हते.
डॉक्टरांनी तो दात माझ्या हातात दिला, दाताकडे पहातच मी खिशात हात घातला व रु.४५०/- देऊन बाहेर पडलो..
आता बायको शांतच होती. घरी येउन पोटपुजा करुन ढाराढुर झोपलो. सकाळी अंथरुणातून जागे झालो तर मुलगी ओरडतचं आली, *बाबा दुसरा दात आपोआप पडला*
बायकोकडे सहज लक्ष गेले व्यवहारीक ज्ञानाची माऊली माझ्यासमोर उभी टाकली होती...
*नितीन कुलकर्णी* पुणे

Comments

Popular posts from this blog

अनुभव आणि आठवणी

अंतराळ

सुखाचा घास