Posts

Showing posts from March, 2018

पायाखालचं गाव

Image
*पायाखालचं गाव* मराठी भाषा, मराठी व्याकरण याची गोडी मला अगदी शालेय वयापासुन. आमचे वडील किर्तनकार, भागवत धर्माची पताका खांद्यावर मिरविणारे शिलेदार त्यामुळे घरात आपसुक संत साहित्याची ग्रंथसंपदा, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, एकनाथ महाराजांचं भागवत व ईतर अनेक संताची लेखनसंपदा. वडिलांनी कधीच हाता कानाला पकडून शिकवलं नाही परंतु कळत-नकळत या गोष्टी मनाच्या गाभाऱ्यात झिरपत गेल्या. माझ्याइतकं किर्तनं नक्कीच कोणी ऐकलेली नसतील. शालेय पाठ्य पुस्तकात असणारं मराठीचं पुस्तक फार आवडायचं विषेशतः पहिल्या पानावर असणारा लेखकाचा फोटो व त्यांची माहिती मनाला भुरळ घालायची शिवाय मराठी विषय शिकविण्यासाठी लाभलेली शिक्षक मंडळी देखील उच्च प्रतीची होती. ष आणि श चा उच्चार कसा करायचा किंवा ण आणि न याविषयी काटेकोर असणारे कुलकर्णी सर अथवा एका लयीत कविता म्हणणारे कोटलवार सर असोत. पुढे दहावी नंतर माझ्या शिक्षणाचा प्रवाह बदलला आणि अभ्यासक्रमातुन मराठी हा विषय गायब झाला मात्र वाचणाची सवय तसुबरदेखील कमी झाली नाही. सुरुवातीच्या काळात व्रतपत्र वाचण एवढच मर्यादित होतं पुढे ते मासिक वाचनापर्यंत आलं. लोकसत्ता, चित्र...

Poem by Prof. Dnyaneshwar Kulkarni

Image

मातीच्या चुली

Image
*मातीच्या चुली* *घरोघर मातीच्या चुली* ही म्हण अगदी लहानपणापासून ऐकतो आहे. शालेय जीवनात या म्हणीचा वाक्यात उपयोग करून बक्कळ मार्क देखिल कमावले आहेत मात्र त्या अजाणत्या वयाचा या म्हणीचा नेमका अर्थ कळलेलाच नव्हता कारण आमच्या घरी चुल असलीतरी इतर आजुबाजुच्या घरात स्टोव्ह किंवा ग्यास होता तर घरोघर मातीच्या चुली कशा काय बुवा हा प्रश्न बालसुलभ मनाला पडायचा. माझी आई फार सुंदर चुल घालायची (चुल घालणे याचा सोपा अर्थ सुजाण वाचकांनी builder of चुल) असा घ्यावा. चांगल्या प्रतीची माती आई पाण्यात कालवायची व मुख्य चुल व त्यालाच चिटकून छोटीशी शेगडी बनवायची शेवटी लोखंडी उलथन्याने ती या गोळ्याला असा काही आकार द्यायची की पहातच रहावे. आईचा चुल घालण्याचा महीमा गावात सर्वदूर पसरलेला होता. अनेकांच्या घरुन तिला बोलावणे यायचे ती देखिल आपल्या प्रपंचातुन वेळ मिळेल तशा प्रकारे विनामूल्य ही सेवा द्यायची. गावातील पाच-सहा प्रतिष्ठित घरातुन आईला हक्काचे बोलावणे यायचे. ही घरे मला उगीचच श्रीमंतांची वाटायची का तर त्यांच्या घराला फरशी होती आमचं घर सडा-सारवणाचं..या आमच्या बालपणीच्या श्रीमंतीच्या कल्पना. अशा घरातुन ब...