Posts

Showing posts from October, 2017

पायाखालचं गाव

Image
*पायाखालचं गाव* मराठी भाषा, मराठी व्याकरण याची गोडी मला अगदी शालेय वयापासुन. आमचे वडील किर्तनकार, भागवत धर्माची पताका खांद्यावर मिरविणारे शिलेदार त्यामुळे घरात आपसुक संत साहित्याची ग्रंथसंपदा, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, एकनाथ महाराजांचं भागवत व ईतर अनेक संताची लेखनसंपदा. वडिलांनी कधीच हाता कानाला पकडून शिकवलं नाही परंतु कळत-नकळत या गोष्टी मनाच्या गाभाऱ्यात झिरपत गेल्या. माझ्याइतकं किर्तनं नक्कीच कोणी ऐकलेली नसतील. शालेय पाठ्य पुस्तकात असणारं मराठीचं पुस्तक फार आवडायचं विषेशतः पहिल्या पानावर असणारा लेखकाचा फोटो व त्यांची माहिती मनाला भुरळ घालायची शिवाय मराठी विषय शिकविण्यासाठी लाभलेली शिक्षक मंडळी देखील उच्च प्रतीची होती. ष आणि श चा उच्चार कसा करायचा किंवा ण आणि न याविषयी काटेकोर असणारे कुलकर्णी सर अथवा एका लयीत कविता म्हणणारे कोटलवार सर असोत. पुढे दहावी नंतर माझ्या शिक्षणाचा प्रवाह बदलला आणि अभ्यासक्रमातुन मराठी हा विषय गायब झाला मात्र वाचणाची सवय तसुबरदेखील कमी झाली नाही. सुरुवातीच्या काळात व्रतपत्र वाचण एवढच मर्यादित होतं पुढे ते मासिक वाचनापर्यंत आलं. लोकसत्ता, चित्र...

वाडा गढीचा....

Image
परवा ऐन दिवाळीत ईतरांची घरे दिव्याच्या प्रकाशात उजळत असताना अंधार अंगावर घेतलेला एक वाडा चक्क माझ्याशी बोलु लागला,"आलास, बरं केलास" अंधारात चाचपडणार्या मला कोणीतरी भेटण्यास आले आठवतय मला तु येणार म्हणजे कीती लगबग असायची वाड्यावरती, चार-पाच गडी माणसं तर आधीच उभी टाकायची मारुतीच्या पारालगत तुझ्या ब्यागा घेण्यासाठी तुझी सरबराई करण्यासाठी अख्खा वाडा झटायचा..माहीत आहे मला आज कोणी सुध्दा नसणार..नाराज होउ नकोस..सरणार्या काळात अनेक गोष्टी विसराव्याच लागतात.... तुला म्हणुन सांगतो, पाच बुरजं, दिंडी दरवाजा आणि मजबुत दगडी खांबात अगदी ऐटीत गावाच्या अगदी प्रवेशद्वारावरतीच मी उभा आहे..नाही म्हटलं तरी मला माज होताच आपल्या रुपाचा, उंचावरुन गावची लगबग पहाताना मजा वाटायची... नवीन लग्न होउन लाजत वाड्यात येणार्या नवललना पासुन ते जख्ख म्हातार्या आजीबाईचा आवाज मी ऐकलेला आहे. कीती जन्म आणि मृत्यू पाहीले याचा हिशोबच नाही.... गुरे-ढोरे, गडी माणसं, सणवारं, सुख-दु:ख अंगाखांद्यावर घेत मी सर्वांना न्याहाळत होतो नवजात शिशुचं रडणं जेवढं मला आवडायचं...नवीन लग्न झालेल्या जोडप्याची कुजबुज अन् बां...

कोडं....

Image
एक कोडं मह्या अजुन नाही उलगडलं समद्यातलं समजतच कसं हो यांना समजतं हे लेका़चे रईस,गाड्या-बंगल्यांचा यांच्याकडे ऊत बोलण्यात यांच्या मात्र गरीबांच्या हिताच भुत टीचभर खळगी भराया हातभर राबतो आम्ही तेव्हा कोठे भेटते आम्हा कोरभर भाजी भाकरी खाऊन खाऊन ढेरीचा घेर वाढलाय तुमच्या आमची पोटं मात्र खपाटीला गेलेली बडवा छात्या तुम्ही तुमच्या तकलादू देशप्रेमाच्या ढोल ताशे तुतार्या अन् पिपाण्या समाजसेवेच्या होऊ द्या चर्चा तुमच्या नसलेल्या प्रामाणिकतेच्या काळ्या मातीशी ईमान राखीत राबराब राबतो आम्ही काळ्या मातीतुनच सोनं उगवतो आम्ही नफ्यापेक्षा जादा तोटाच सहन करतो आम्ही आमच्या टाळुवरचं लोणं ढापणार्या गिधाडांनो नका लावू आमच्या अस्मितेची बोली आमच्या अस्मितेचा सुर्य उगवायचा अजुन बाकी आहे उगवल्यानंतर मात्र तुमची दाणादाण निश्चित आहे... नितीन कुलकर्णी, पुणे

गाव..

विशिष्ट वयात आपलं शिक्षण होतं. शालेय शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी सुटणारं आपलं गाव पुढेपुढे नौकरी-व्यवसायासाठी शहरात स्थिरावतं. लग्न, मुलेबाळे, पोटभरी या चिंता प्रत...

बातमी

बातमी !!! डिप्लोमा झाल्यानंतर मी माझ्या गावाजवळील शहरात एका छोट्या कंपनीत सेल्स डिपार्टमेंट मध्ये नौकरीचा श्रीगणेशा केला.कंपनी छोटी असली तरी माझं काम मोठं होतं. कंपनीच...

सुखाचा शोध

Image
खरच सांगतो..मी पुरता पिचलोय.. प्रपंचाच्या ओझ्याने.. मुलांच्या हट्टाने . ऑफिसातल्या कामाने.. साहेबाच्या ओरडण्याने.. हे स्थळ तेव्हाच नाकारलं असतं तर... आज मी दसपट सुखी असते या बायकोच्या टोमण्याने... सुखावतो मी अधन-मधनं आई-दादाच्या आठवाणे.. गरीबीतील श्रीमंती बालपणाने.. ईयत्ता चौथीत असताना घेतलेल्या चामडी चपलेच्या वासाने.. ऐन दसर्यात घेतलेल्या नव्या कोर्या चड्डी सदर्याने.. घार्या डोळ्याच्या शाळा मैत्रिणीच्या.. हळुवार सयीने... होत असते डागडुजी अधनं मधनं मुलांना मागेल ते पुरविल्याने.. माहेरच्या माणसांची तारीफ करण्याने.. साहेबाची चापुलसी केल्याने.. मी मात्र शोध घेत असतो सुखाचा.. अंतराळात... ते मात्र नेहमी गवसते मला माझ्याच बालपणात.. नितीन कुलकर्णी, पुणे

गावाकडचं मन.....

गड्या, मन माझं गावाकडच..मी गावाकडचा.. गावातल्या गल्लीतलं..गल्लीतल्या घराचं.. घरातल्या अंगणाचं..अंगणातल्या झाडाचं.. वीट आलाय मला..शहरातल्या रहदारीचा.. मॉलमधल्या गर्दीचा..गर्...

दिवाळी

दिवाळी आणि लहानपणाचं अतुट नातं असतं.तुमचं वय आणि समज भले कीतीही वाढो अंतरंगात मात्र बालपणाचेच फटाके उडत असतात. आज मुलासोबत होणारी शहरी दिवाळी ज्यामध्ये सर्व काही उपलब्...

संत-उपकार

संत-उपकार पंढरीचा विठोबा ही केवळ दगडात वसलेली मुर्ती नव्हे तर ते चराचरात वसलेलं चैतन्य रुप आहे. विठ्ठलाच्या दर्शनाने अतीव आनंद तर होतोच मात्र सामान्य मानवी जिवांचा उध...