Posts

पायाखालचं गाव

Image
*पायाखालचं गाव* मराठी भाषा, मराठी व्याकरण याची गोडी मला अगदी शालेय वयापासुन. आमचे वडील किर्तनकार, भागवत धर्माची पताका खांद्यावर मिरविणारे शिलेदार त्यामुळे घरात आपसुक संत साहित्याची ग्रंथसंपदा, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, एकनाथ महाराजांचं भागवत व ईतर अनेक संताची लेखनसंपदा. वडिलांनी कधीच हाता कानाला पकडून शिकवलं नाही परंतु कळत-नकळत या गोष्टी मनाच्या गाभाऱ्यात झिरपत गेल्या. माझ्याइतकं किर्तनं नक्कीच कोणी ऐकलेली नसतील. शालेय पाठ्य पुस्तकात असणारं मराठीचं पुस्तक फार आवडायचं विषेशतः पहिल्या पानावर असणारा लेखकाचा फोटो व त्यांची माहिती मनाला भुरळ घालायची शिवाय मराठी विषय शिकविण्यासाठी लाभलेली शिक्षक मंडळी देखील उच्च प्रतीची होती. ष आणि श चा उच्चार कसा करायचा किंवा ण आणि न याविषयी काटेकोर असणारे कुलकर्णी सर अथवा एका लयीत कविता म्हणणारे कोटलवार सर असोत. पुढे दहावी नंतर माझ्या शिक्षणाचा प्रवाह बदलला आणि अभ्यासक्रमातुन मराठी हा विषय गायब झाला मात्र वाचणाची सवय तसुबरदेखील कमी झाली नाही. सुरुवातीच्या काळात व्रतपत्र वाचण एवढच मर्यादित होतं पुढे ते मासिक वाचनापर्यंत आलं. लोकसत्ता, चित्र...

अनुभव आणि आठवणी

Image
*अनुभव आणि आठवणी* * पिकलेला आंबा आणि झाडावर लटकणारा कच्च्या आंबा आपण कधी पाहिला आहे का..नसेल पाहिला तर अवश्य पहा, पिकलेला आंबा शांत, संयमी व पोक्त भासतो, आता आपण लोकांच्या उपयोगी येणार ही समाधानाची भावना त्याच्या चेहर्यावर भासते, तर आंब्याच्या झाडावर लटकणारा हिरवा आंबा मात्र स्वतःच्या मस्तीत असतो. आनंदाने डोलत असतो बरं त्याला आधार देणारी फांदी देखील मजबूत असते. तारुण्याची रग आणि मस्ती त्यात असते. अनुभव आणि आठवण यांचं एक साटलोटं असतं. वय जसजसं पुढे सरकतं तसतसं आठवणीचं गाठोडं वाढत जातं त्यातील बर्याच आठवणींना आपण अनुभव असं म्हणतो. अनुभवसंपन्न जीवन आपली निर्णयक्षमता व क्रय शक्ती वाढवित असतं.. ईयत्ता पहिली व दुसरीत असताना मला शाळेचा लळा अजिबात नव्हता. शाळेत जाणे म्हणजे मला एकप्रकारची शिक्षाच वाटायची. नको ती शाळा अन नको तो अभ्यास असच वाटायच. मात्र या वयात मी तोंडाने शिट्टी फार जोराची वाजवायचो. मी वाजवलेली शिट्टी दूरपर्यंत ऐकु जायची. बरीचशी मोठी माणसे, कॉलेजातील मुले मला थांबवून शिट्टी वाजवून घ्यायचे व काहीतरी बक्षीसं द्यायची. दुसरीत असताना बेल्लाळे नावाचे शिक्षक आम्हाला होते. त्यावे...

जलमित्र

Image
*जलमित्र*.. *गिरीश कुलकर्णी*.. आणि *आम्ही* मराठवाड्यात जन्मलेला मी नव्हे मराठवाड्याचा वतनदारच म्हणा हवं तर. मराठवाड्याची माती, तिचा गंध, तेथील माणसे, भाषा, गुरेढोरे सगळं सगळं नसानसात मुरलेलं. लहाणपणापासुन आडावर पोहर्याने किंवा चक्क घागरीने पाणी उपसणार्या महिला पाहिलेला मी, हापसा, सार्वजनिक हौद ते ट्यांकर यावर होणारी एका एका घागरीसाठी होणारी झटापट पाहिलेला मी, चावी फिरवली की पाणी येतं असं जर कोणी त्याकाळी सांगीतलं असतं तर त्याला चक्क मुर्खात काढणारा मी, उन्हाळ्याचं लाही लाही करणारं उन अंगाखांद्यावर घेत काबाडकष्ट करणारा शेतकरी आपलं खपाटी गेलेलं पोट व गालफाड बसलेला चेहरा घेउन किलकिल्या नजरेनं टिपुसभर थेंबासाठी आभाळाकडे डोळे लावलेला पाहिलेला मी. तर अशा या मी ला कोणी पाण्याचे महत्व सांगत असेलतर त्याच्या सारखा शहाणा तोच. आता इतकी मनात अढी असेल आणि कोणी पाण्यासाठी काही करीत असेलतर तर पुर्वग्रहदोष असणारच व या अशामुळे काही सुध्दा होणार नाही फक्त करणार्या लोकांची प्रसिध्दी होणार हे माझे ठाम मत. अशा सर्व पार्श्वभूमीवर साधारण मे महिन्याच्या दोन-तीन दिवस आधी आमच्या पुरणमल लाहोटिच्या ग्रुप...

अंतराळ

* अंतराळ* खरच सांगतो...मी पुरता पिचलोय प्रपंचाच्या ओझ्याने.. मुलांच्या हट्टाने.. साहेबाच्या ओरडण्याने.. हे स्थळ तेव्हाच नाकारलं असतं तर मी दहापट सुखी असते या बायकोच्या परवलीच्या वाक्याने.. सुखावतो मी अधनं-मधनं आई- दादाच्या आठवाणे गरीबीतील श्रीमंती बालपणाने ईयत्ता चौथीत असताना घेतलेल्या चामड्याच्या चपलेच्या वासाने ऐन दसर्यात सोनीच्या कापड दुकानातून घेतलेल्या नव्या-कोर्या चड्डी सदर्याने.. घार्या डोळ्याच्या शाळा मैत्रीनीच्या सयीने अधनं-मधनं होत असते डागडुजी मुलांना मागेल ते पुरविल्याने साहेबाची चापुलसी करण्याने बायकोच्या माहेर माणसांची तारीफ करण्याने.. मी मात्र शोध घेत असतो सुखाचा अंतराळात... ते मात्र नेहमी गवसते मला माझ्या बालपणात. *नितीन कुलकर्णी*

सुखाचा घास

Image
सुखाचा घास रविवार म्हटलं तर आरामाचा दिवस, अंमळ उशिरा उठावं..निवांत आवरावं..कोणत्याही प्रकारची घाई नाही.बायकोची देखिल हीच ईच्छा. सोमवार ते शनिवार मुलांच्या शाळेसाठी पहाटे पाच पासुन राबणाऱ्या पत्नीला साहजिकच वाटु शकते की रविवारी थोडं उशिरा अंथरुनातुन जागं व्हावं.. एरवी सकाळी आठ वाजता उठणारे आम्ही रविवारी मात्र हमखास सहा वाजताच जागी होतो आता आम्ही उठलो म्हटल्या नंतर बायकोला देखील उठावच लागतं व रविवारची सुरुवातच मुळात वादाने सुरू होते. तिची पुर्णपणे खात्री आहे की तिला छळण्यासाठी म्हणुनच आम्ही मुद्दाम लवकर उठतो.. कालचा रविवार मात्र वेगळाच होता. पहाटे जाग आली आणि आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी जायचं असं वाटलं. होतं असं कधी कधी. एरवी कंपनीच्या कामानिमित्त आळंदी भागात जाणं होतच व गेल्यानंतर माऊलीचं दर्शन होतं. आज मात्र खास माऊलीच्या दर्शनाची ओढ लागली होती. मग काय शुभस्य शिघ्रम..भराभर आवरलं व स्प्लेंडरोबा वरती टांग मारुन आमची स्वारी आळंदीच्या दिशेने निघाली.. आळंदीला पोंहचताच आम्हाला समजलं की गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांचे पसायदान या विषयावरती व्याख्यान आहे. आमची स्वारी तडक फ्रु...

Poem by Prof. Dnyaneshwar Kulkarni

Image

मातीच्या चुली

Image
*मातीच्या चुली* *घरोघर मातीच्या चुली* ही म्हण अगदी लहानपणापासून ऐकतो आहे. शालेय जीवनात या म्हणीचा वाक्यात उपयोग करून बक्कळ मार्क देखिल कमावले आहेत मात्र त्या अजाणत्या वयाचा या म्हणीचा नेमका अर्थ कळलेलाच नव्हता कारण आमच्या घरी चुल असलीतरी इतर आजुबाजुच्या घरात स्टोव्ह किंवा ग्यास होता तर घरोघर मातीच्या चुली कशा काय बुवा हा प्रश्न बालसुलभ मनाला पडायचा. माझी आई फार सुंदर चुल घालायची (चुल घालणे याचा सोपा अर्थ सुजाण वाचकांनी builder of चुल) असा घ्यावा. चांगल्या प्रतीची माती आई पाण्यात कालवायची व मुख्य चुल व त्यालाच चिटकून छोटीशी शेगडी बनवायची शेवटी लोखंडी उलथन्याने ती या गोळ्याला असा काही आकार द्यायची की पहातच रहावे. आईचा चुल घालण्याचा महीमा गावात सर्वदूर पसरलेला होता. अनेकांच्या घरुन तिला बोलावणे यायचे ती देखिल आपल्या प्रपंचातुन वेळ मिळेल तशा प्रकारे विनामूल्य ही सेवा द्यायची. गावातील पाच-सहा प्रतिष्ठित घरातुन आईला हक्काचे बोलावणे यायचे. ही घरे मला उगीचच श्रीमंतांची वाटायची का तर त्यांच्या घराला फरशी होती आमचं घर सडा-सारवणाचं..या आमच्या बालपणीच्या श्रीमंतीच्या कल्पना. अशा घरातुन ब...