Posts

Showing posts from September, 2018

पायाखालचं गाव

Image
*पायाखालचं गाव* मराठी भाषा, मराठी व्याकरण याची गोडी मला अगदी शालेय वयापासुन. आमचे वडील किर्तनकार, भागवत धर्माची पताका खांद्यावर मिरविणारे शिलेदार त्यामुळे घरात आपसुक संत साहित्याची ग्रंथसंपदा, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, एकनाथ महाराजांचं भागवत व ईतर अनेक संताची लेखनसंपदा. वडिलांनी कधीच हाता कानाला पकडून शिकवलं नाही परंतु कळत-नकळत या गोष्टी मनाच्या गाभाऱ्यात झिरपत गेल्या. माझ्याइतकं किर्तनं नक्कीच कोणी ऐकलेली नसतील. शालेय पाठ्य पुस्तकात असणारं मराठीचं पुस्तक फार आवडायचं विषेशतः पहिल्या पानावर असणारा लेखकाचा फोटो व त्यांची माहिती मनाला भुरळ घालायची शिवाय मराठी विषय शिकविण्यासाठी लाभलेली शिक्षक मंडळी देखील उच्च प्रतीची होती. ष आणि श चा उच्चार कसा करायचा किंवा ण आणि न याविषयी काटेकोर असणारे कुलकर्णी सर अथवा एका लयीत कविता म्हणणारे कोटलवार सर असोत. पुढे दहावी नंतर माझ्या शिक्षणाचा प्रवाह बदलला आणि अभ्यासक्रमातुन मराठी हा विषय गायब झाला मात्र वाचणाची सवय तसुबरदेखील कमी झाली नाही. सुरुवातीच्या काळात व्रतपत्र वाचण एवढच मर्यादित होतं पुढे ते मासिक वाचनापर्यंत आलं. लोकसत्ता, चित्र...

अनुभव आणि आठवणी

Image
*अनुभव आणि आठवणी* * पिकलेला आंबा आणि झाडावर लटकणारा कच्च्या आंबा आपण कधी पाहिला आहे का..नसेल पाहिला तर अवश्य पहा, पिकलेला आंबा शांत, संयमी व पोक्त भासतो, आता आपण लोकांच्या उपयोगी येणार ही समाधानाची भावना त्याच्या चेहर्यावर भासते, तर आंब्याच्या झाडावर लटकणारा हिरवा आंबा मात्र स्वतःच्या मस्तीत असतो. आनंदाने डोलत असतो बरं त्याला आधार देणारी फांदी देखील मजबूत असते. तारुण्याची रग आणि मस्ती त्यात असते. अनुभव आणि आठवण यांचं एक साटलोटं असतं. वय जसजसं पुढे सरकतं तसतसं आठवणीचं गाठोडं वाढत जातं त्यातील बर्याच आठवणींना आपण अनुभव असं म्हणतो. अनुभवसंपन्न जीवन आपली निर्णयक्षमता व क्रय शक्ती वाढवित असतं.. ईयत्ता पहिली व दुसरीत असताना मला शाळेचा लळा अजिबात नव्हता. शाळेत जाणे म्हणजे मला एकप्रकारची शिक्षाच वाटायची. नको ती शाळा अन नको तो अभ्यास असच वाटायच. मात्र या वयात मी तोंडाने शिट्टी फार जोराची वाजवायचो. मी वाजवलेली शिट्टी दूरपर्यंत ऐकु जायची. बरीचशी मोठी माणसे, कॉलेजातील मुले मला थांबवून शिट्टी वाजवून घ्यायचे व काहीतरी बक्षीसं द्यायची. दुसरीत असताना बेल्लाळे नावाचे शिक्षक आम्हाला होते. त्यावे...