*अनुभव आणि आठवणी*
*
पिकलेला आंबा आणि झाडावर लटकणारा कच्च्या आंबा आपण कधी पाहिला आहे का..नसेल पाहिला तर अवश्य पहा, पिकलेला आंबा शांत, संयमी व पोक्त भासतो, आता आपण लोकांच्या उपयोगी येणार ही समाधानाची भावना त्याच्या चेहर्यावर भासते, तर आंब्याच्या झाडावर लटकणारा हिरवा आंबा मात्र स्वतःच्या मस्तीत असतो. आनंदाने डोलत असतो बरं त्याला आधार देणारी फांदी देखील मजबूत असते. तारुण्याची रग आणि मस्ती त्यात असते.
अनुभव आणि आठवण यांचं एक साटलोटं असतं. वय जसजसं पुढे सरकतं तसतसं आठवणीचं गाठोडं वाढत जातं त्यातील बर्याच आठवणींना आपण अनुभव असं म्हणतो. अनुभवसंपन्न जीवन आपली निर्णयक्षमता व क्रय शक्ती वाढवित असतं..
ईयत्ता पहिली व दुसरीत असताना मला शाळेचा लळा अजिबात नव्हता. शाळेत जाणे म्हणजे मला एकप्रकारची शिक्षाच वाटायची. नको ती शाळा अन नको तो अभ्यास असच वाटायच. मात्र या वयात मी तोंडाने शिट्टी फार जोराची वाजवायचो. मी वाजवलेली शिट्टी दूरपर्यंत ऐकु जायची. बरीचशी मोठी माणसे, कॉलेजातील मुले मला थांबवून शिट्टी वाजवून घ्यायचे व काहीतरी बक्षीसं द्यायची.
दुसरीत असताना बेल्लाळे नावाचे शिक्षक आम्हाला होते. त्यावेळी शिक्षकांनी मुलांना शिक्षा करायचीच हा अलिखित नियम होता. कित्येक पालक शाळेत येउन शिक्षकाला सांगायची "गुरुजी याला बदडुन काढा" शिक्षकांचा हेतु आणि मन साफ होतं कदाचित यामुळेच मला वाटते माझी पिढी जुन्याचा अंगीकार व नव्याचा स्विकार लिलया करु शकते.
आमची शाळा दोन सत्रात असायची सकाळी नऊ ते बारा व दुपारी एक ते चार. मधल्या सुट्टीत घरी जेवनासाठी यायचे, टिफीन, डबा या शब्दाला काही थारा नव्हता, असाच एका दुपारी मित्रासोबत मधल्या सुट्टीत जेवनासाठी घरी येत होतो, पोटात कावळे ओरडत होती, दुरडीतील भाकर पोटात केव्हा जाईल असे झाले होते.. अशातच या आमच्या गुरुजींना माझी खोड काढण्याची लहर आली व त्यांनी पाठीमागून येत माझ्या मानगुटीला धरलं. जेमतेम सहा वर्षाचा मी आणि त्यात ती माझी कोवळी मान, मला हलताच येईना, जीव कासावीस झाला, सर्व शक्ती एकवटुन मी मागे पहाण्याचा प्रयत्न केला, मला प्यांटीसारखं काहीतरी दिसलं त्याकाळी बेलबॉटम नावाचा प्रकार होता म्हणजे प्यांटीचा खालील भाग मोठा असायचा बास तेवढाच मला दिसला व माझी खात्री झाली की हा आगाऊपणा कोणीतरी कॉलेजच्या मुलानेच केलेली आहे, पोटातील भुक व दुखणारी मान याचा परिणाम असा झाला की एक खणखणीत शिवी माझ्या चिमुकल्या तोंडातुन बाहेर पडली. ती ऐकता क्षणीच शिक्षकांचा हात सैल झाला, आजुबाजुची मित्रं निशब्द।.मी मागे वळून पाहिलं.. साक्षात माझे गुरुजी..मी जे घराकडे धुम ठोकली, आठ दिवस शाळेला दांडी.
तिसरी आणि चौथीत मात्र शैला देशपांडे नावाच्या शिक्षिका आम्हांला शिकविण्यासाठी आल्या व खर्या अर्थाने शाळेची गोडी व अभ्यासाची ओढ मला लागली.. "हाडाचा शिक्षक" हा शब्द शिक्षकासाठी का वापरतात हे देशपांडे म्याडमकडे पाहुन समजते. चौथीत असतांना मध्यंतर काळात आम्ही चार- पाच मुले शाळेच्या मैदानावर खेळत होतो. शाळेजवळच एक बंगला होता व त्या बंगल्यात पेरुची (आमच्याकडे पेरुला जांब म्हणतात) बाग होती. नेमके त्या दिवशी त्या बंगल्याला कुलुप होते, आमच्यापैकी कोणाच्यातरी डोक्यातून बागेतील पेरु आणण्याची शक्कल निघाली मग काय बंगल्याला असणार्या कुंपण भिंतीजवळ आम्ही गेलो एक जण खाली वाकला, एकजण त्याच्या पाठीवर थांबून उडी मारत आतमध्ये शिरला.. आतमध्ये शिरल्यानंतर मात्र त्याला भिती वाटली व काहीच न घेता तो तसाच रिकाम्या हाताने परतला नेमके हे द्रश्य मैदानावर असणार्या बालवाडीतील एका शिक्षीकीने पाहिले व त्यांनी ओढतच आम्हाला देशपांडे बाईसमोर उभे केले. टोळीतील आम्ही सर्वजण बर्यापैकी हुशार व चांगली होतो. आमचा कारनामा ऐकताच बाईंचा पारा चढला व त्यांनी बेशरमाचा ओला फोक मागविला व आमच्या कोवळ्या हातावर छडी लागे छमछम सुरु झाले, एवढेच नाही संबंध दिवसभर आम्हाला उभे राहुनच लिहिण्याची शिक्षा सुनावली..पुढे मी चौथी बोर्डात प्रथम क्रमांक मिळविला ती बात निराळी...
खाजगी कंपनीतील नौकरीमुळे काही काळ माझे वास्तव्य कोल्हापूर शहरात होते. असाच ऐके दिवशी अंबाबाईच्या देवळात असताना रांगेत एक क्रश, दाढीचे खुंटरं वाढलेला ओळखीचा चेहरा दिसला. नेमकी आमची नजरानजर झाली व तो माझ्याकडेच आला " साहेब, तुम्ही येथे कसे काय?" खरेतर हा प्रश्न मला पडला होता पण त्यानेच विचारले. मी त्याला ओळखले, हा आमच्या जुनाच परिचयाचा, गावकडचा, माझ्यापेक्षा पाच-सहा वर्षानी लहान..माझं आकर्षण असणारा, माझ्या ढेरीचं आप्रुप असणारा व गरज नसताना मला साहेब म्हणणारा.. त्याची एकुण परिस्थिती ऐकुन घेतली, शैक्षणिक अपयश व वडीलांसोबत होणार्या कुरबुरीमुळे तो न सांगताच आला होता, त्याला खोलीवर नेल़ खाऊपिऊ घातलं. तो आठ- पंधरा दिवस कामासाठी जात असे, भाजीच्या टेंपोसोबत कोकण फीर, एखाद्या साईटवर किंवा काहीतरी सटरफटर..अधनं मधनं माझ्याकडे यायचा..रात्र- रात्र त्याचे किस्से सांगायचा..हे किस्से सांगण्याची त्याची कला अफलातून होती..मलादेखील ते आवडायचे, माझी हसुन वाट लागायची. पुढे मी माझ्या व्यापात व्यस्त झालो , तोदेखील गायब झाला हळूहळू तो विषय विस्मृतीत गेला. तब्बल दहा वर्षानंतर गावी गेलो असताना एक नवी कोरी पांढर्या रंगाची कार माझ्याजवळ येऊन थांबली, कोणीतरी असेल म्हणत मी.कानाडोळा केला तर त्यातुन हे महाशय उतरले. अंगात पांढरेशुभ्र कपडे, पायात बुट, बोटात अंगठ्या व हातात मोबाईल, पोट पुढे आलेले..'काय साहेब" भारदस्त आवाज, मी तर उडालोच.. कारण मी त्याच्यासमोर बारीक दिसत होतो, "हे कसे काय"?? अशाप्रकारची अनेक प्रश्न माझ्या चेहऱ्यावर होती ती त्याने ओळखली असावी व सहज बोलला, काही नाही साहेब, लग्न केलं मंडळी शिक्षिका आहे, मी गावचा सरपंच आहे व दोन तीन कॉलेज आहेत बाकी काही नाही.. एक प्रश्न मात्र त्याने स्वतःच्या ढेरीकडे पहात विचारला " साहेब, हे कसे कमी करायचे'?? एवढे सांगा. मी माझ्या कपाळावर हात मारुन घेतला..
माझं लग्न होउन जेमतेम दिड वर्ष झाली होती. बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या बायकोला आणण्यासाठी मी गावी आलो व गावाकडेच राहु लागलो..कंपनीतील नौकरीत माझे मन रमत नव्हते. गावीच काहीतरी करावे..शेत आहे..घर आहे..शहरातील अस्थिरतेपेक्षा गावातील स्थिरता बरी असे काही बाही विचार येत. खिशात पैसा तर अजिबात नव्हता. त्यात बायको व आता मुलगा.. माझ्या गावी रहाण्याला वडीलांचा कडकडीत विरोध होता. त्यांचं म्हणणं असायच ' येथे राहुन काही होणार नाही" तु कोठेही जा पण येथे राहु नको.. वडील हे बोलायचे मात्र हजार - पाचशे रु. काढुन देत नव्हते. आमची रोज खडाजंगी व्हायची. मला राग यायचा.. माझ्या कमरेवर लटकणार्या मोबाईल ला पाहुन भाळलेली माझी पत्नी मात्र शांत रहायची. माझी अडचण तिच्या लक्षात यायची. असेच ऐके दिवशी माझे सासरे मुलीला व नातवाला पहाण्यासाठी आले..एकुण परिस्थिती त्यांच्या लक्षात आली. माझे सासरे फार हुशार जातांना त्यांनी अलगद माझ्या मुलाच्या खिशात करकरीत पाचशेची नोट टाकली व ते गेले..बायकोने लगेचच ते मला दिले व म्हणाली 'आता तुम्ही जा, मी माझे पहाते" त्यातील काही पैसे मुलाच्या औषधासाठी खर्च केले व सुटकेसमध्ये दोन ड्रेस व अंडरविअर-बनियन घेऊन दिवसाच्या बसने पुण्याचा प्रवास.सुरु केला, पुण्याचं तिकीट तेव्हा दोनशे रु.च्या आसपास होतं. संध्याकाळी सात-आठ वाजता गाडी शिवाजीनगर बसस्थानकावर आली, मी बस मधनं खाली उतरलो खिशात जेमतेम 170रु. शिल्लक होते. कोठे जायचे याचा पत्ता नाही, काय करायचे? ठाऊक नाही..सगळा अंधकार
एका जुन्या मित्राचा नंबर होता, म्हटलं याला फोन करावा, आजची रात्र घालावी, ऊद्याचं हरी ऊद्या.. फोन लागला त्याने तो उचलला..सुरुवातीला गोड बोलणारा हळूहळू कडवडपणावर आला व काहीतरी अडचण सांगु लागला, त्याचे देखील चुक नव्हते वन आर.के. मध्ये तो, त्याची पत्नी व आई-वडील.
पुन्हा प्रश्न... दुसर्या एकाक्षगावाकडील मित्राचा नंबर होता. त्याला फोन लावला, त्याला अतिशय आनंद झाला, नुकतेच त्याने कर्वेनगर भागात मेडिकल दुकान सुरु केलेले होते तो म्हणाला, ' नितीन, करिश्मा पर्यंत ये मी तुला न्यायला येतो. व मग काय मी खुषच. त्याच्या दुकानावर पोंहचलो, सूटकेस टेकवली, आनंदाची गोष्ट म्हणजे त्याचा मोठा भाऊ जो माझा लहानपणीचा मित्र जो दुकान सांभाळण्यासाठी आला होता.
झोपण्याची तरी सोय झाली होती. दुकान दहा वाजता बंद होई, कांउंटरच्या एका बाजुला तो व एका बाजुला मी गप्पांचा फड रंगवित केव्हा झोपत ते सयजतच नसे. सकाळी लवकर उठुन मी सोसायटीच्या बाथरुममध्ये माझी आंघोळ व इतर क्रिया आटपत.असे
तिसर्या दिवशीच मला एका कंपनीत नौकरी लागली व माझा गाडा सुरु झाला. दहा.दिवसातच फ्लॅट घेतला यथावकाश सासर्याने बायकोला व मुलाला पुण्याला आणुन सोडले व 170रु. पासुन सुरु झालेला प्रवास.हाईवेला केव्हा लागला हेच समजले नाही.आजही कर्वेनगर ने जातो तेव्हा ते दुकान पाहून क्रतज्ञेची भावना जागृत होते. मित्राने दुकान केव्हाच बंद केलेले आहे.
अशी असतात अनुभव व आठवणी, काही गोड.काही कडु. संघर्षमय अनुभव आपणास उभारी देतात. काही अनुभव आपणास माणसातील चांगुलपणाची दर्शन देतात तर काही वाईटपणाची.
सलाम माझा माणसातील सज्जनतेला...
*नितीन कुलकर्णी*
पुणे

Comments
Post a Comment