पायाखालचं गाव

Image
*पायाखालचं गाव* मराठी भाषा, मराठी व्याकरण याची गोडी मला अगदी शालेय वयापासुन. आमचे वडील किर्तनकार, भागवत धर्माची पताका खांद्यावर मिरविणारे शिलेदार त्यामुळे घरात आपसुक संत साहित्याची ग्रंथसंपदा, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, एकनाथ महाराजांचं भागवत व ईतर अनेक संताची लेखनसंपदा. वडिलांनी कधीच हाता कानाला पकडून शिकवलं नाही परंतु कळत-नकळत या गोष्टी मनाच्या गाभाऱ्यात झिरपत गेल्या. माझ्याइतकं किर्तनं नक्कीच कोणी ऐकलेली नसतील. शालेय पाठ्य पुस्तकात असणारं मराठीचं पुस्तक फार आवडायचं विषेशतः पहिल्या पानावर असणारा लेखकाचा फोटो व त्यांची माहिती मनाला भुरळ घालायची शिवाय मराठी विषय शिकविण्यासाठी लाभलेली शिक्षक मंडळी देखील उच्च प्रतीची होती. ष आणि श चा उच्चार कसा करायचा किंवा ण आणि न याविषयी काटेकोर असणारे कुलकर्णी सर अथवा एका लयीत कविता म्हणणारे कोटलवार सर असोत. पुढे दहावी नंतर माझ्या शिक्षणाचा प्रवाह बदलला आणि अभ्यासक्रमातुन मराठी हा विषय गायब झाला मात्र वाचणाची सवय तसुबरदेखील कमी झाली नाही. सुरुवातीच्या काळात व्रतपत्र वाचण एवढच मर्यादित होतं पुढे ते मासिक वाचनापर्यंत आलं. लोकसत्ता, चित्र...

जलमित्र


  1. *जलमित्र*.. *गिरीश कुलकर्णी*.. आणि *आम्ही*


मराठवाड्यात जन्मलेला मी नव्हे मराठवाड्याचा वतनदारच म्हणा हवं तर. मराठवाड्याची माती, तिचा गंध, तेथील माणसे, भाषा, गुरेढोरे सगळं सगळं नसानसात मुरलेलं. लहाणपणापासुन आडावर पोहर्याने किंवा चक्क घागरीने पाणी उपसणार्या महिला पाहिलेला मी, हापसा, सार्वजनिक हौद ते ट्यांकर यावर होणारी एका एका घागरीसाठी होणारी झटापट पाहिलेला मी, चावी फिरवली की पाणी येतं असं जर कोणी त्याकाळी सांगीतलं असतं तर त्याला चक्क मुर्खात काढणारा मी, उन्हाळ्याचं लाही लाही करणारं उन अंगाखांद्यावर घेत काबाडकष्ट करणारा शेतकरी आपलं खपाटी गेलेलं पोट व गालफाड बसलेला चेहरा घेउन किलकिल्या नजरेनं टिपुसभर थेंबासाठी आभाळाकडे डोळे लावलेला पाहिलेला मी.
तर अशा या मी ला कोणी पाण्याचे महत्व सांगत असेलतर त्याच्या सारखा शहाणा तोच. आता इतकी मनात अढी असेल आणि कोणी पाण्यासाठी काही करीत असेलतर तर पुर्वग्रहदोष असणारच व या अशामुळे काही सुध्दा होणार नाही फक्त करणार्या लोकांची प्रसिध्दी होणार हे माझे ठाम मत.

अशा सर्व पार्श्वभूमीवर साधारण मे महिन्याच्या दोन-तीन दिवस आधी आमच्या पुरणमल लाहोटिच्या ग्रुपवर श्रमदाना संबधी मेसेज आला व प्रसिद्ध मराठी कलाकार गिरीश कुलकर्णी त्याचं नेतृत्व करणार आहे असं सांगण्यात आलं.
*गिरीश कुलकर्णी* आमचा वर्गमित्र, सात कुलकर्ण्यापैकी एक, होय आमच्या वर्गात सात कुलकर्णी, सर्वांची ओळख एमबी,एसएस,एसआर,डीबी,एनएम अशाप्रकारची त्यातील हा जीपी...
कॉलेजचा पहिला दिवस, बाहेर पोर्चमध्ये आम्ही सर्व मुले थांबलेली आहोत त्यात एक किरकोळ अंगकाठीचा, शर्ट प्यांटात खोचलेला, पायात शुज घातलेला व पाठीवर स्याग अडकावलेला मुलगा आपल्या पुणेरी लयीत बडबड करीत होता आम्ही सर्व ग्रामीण भागातुन आलेलो त्यामुळे प्यांटीत शर्ट खोचणे हेच आमच्यासाठी मोठी गोष्ट.आपसुक या मुलाचा दबदबा आमच्यावर पडला व तो कायमच राहीला. गिरीश कॉलेजमध्ये प्रत्येक गोष्टीत हीरीहीरीने भाग घ्यायचा मग ते क्रिकेट असो अथवा ग्यादरींग काळात होणारी नाटके, त्याने केलेले मोरुची मावशी आज देखील आठवते. एकमात्र नक्की सांगतो त्याकाळी जर मला कोणी सांगितले असते की हा भविष्यात मोठा नट होणार आहे,,मी तरी विश्वास ठेवला नसता. गिरीश मोठा कलाकार तर आहेच त्याहीपेक्षा माणुस म्हणून तो फार मोठा आहे त्याची संवेदनशीलता, समाजाविषयी असणारी आस्था वाखाणण्याजोगी आहे. इतका मोठा कलाकार असुन देखील त्याचे पाय कायम जमीनीवर असतात. जेव्हा केव्हा त्याची भेट होते तेव्हा अतिशय आस्था पुर्वक तो संवाद साधतो. आपल्यासोबत शिकलेला एक वर्गमित्र जेव्हा या उंचीवर पोंहचतो तेव्हा आपली छाती अभिमानाने फुगते.

अशा गिरीशनं आव्हान केलं म्हटल्यानंतर मी बिनधोकपणाने माझा सहभाग नोंदवला एवढेच नाहीतर एक तारखेला पहाटे तीन वाजता उठून वेळेत गाडी पकडली व माझ्या बायकोला आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

या सर्व मोहिमेचा नियोजन एवढ आखीव आणि रेखीव होतं की याला तोड नाही. इतक्या सर्वांना एकत्रित बांधने हे वाटतं तितकं सोपं नाही मात्र हे अवघड वाटणारं काम आमचा दुसरा मित्र नरेंद्र ईचे लिलया पेलतो. एका मोठ्या कंपनीत उच्चपदस्थ असुन देखील अतिशय साधा , सर्वांची विचारपूस व काळजी करणारा हा मित्र ग्रेटच.

आम्ही सर्व तथाकथित शहरी मंडळी इप्सित स्थळी वेळेवर पोंहचलो व सर्वांनी अगदी झोकुन श्रमदान केलं. त्यानंतर गावकऱ्यांनी दिलेलं भोजन अप्रतिम.

परतीच्या प्रवासात जेव्हा मी गाडीत शांतपणाने बसलो तेव्हा मला माझ्यातील अढी गळुन पडल्यासारखी भासली, कोणीतरी निष्काम व्रत्तीने हे काम करीत आहे ही जाणीव झाली..एकदिलाने..एकनेटाने हे काम केले तर दुष्काळ हटवणे सहज शक्य आहे हा आत्मविश्वास जाग्रत झाला. श्रमदानात लोकसहभाग ही या लोकांची संकल्पनाच मला फार आवडली.

शेवटी माध्यम काहीही असो,.पुढाकार कोणीही घेवो माझ्या मराठवाड्यातील दुष्काळ संपावा. येथील शेतकर्याच्या घामाने भिजणारी माती पावसाच्या पाण्याने ओली व्हावी व त्यातुन आपुलकीचे कोंब फुटावे.
इतक्या वर्षापासून पुण्यात रहातोय मात्र मराठवाड्याची नाळ काही केल्या तुटत नाही..
गिरीश यु आर ग्रेट...
*नितीन कुलकर्णी*

Comments

Popular posts from this blog

अनुभव आणि आठवणी

अंतराळ

सुखाचा घास