पायाखालचं गाव

Image
*पायाखालचं गाव* मराठी भाषा, मराठी व्याकरण याची गोडी मला अगदी शालेय वयापासुन. आमचे वडील किर्तनकार, भागवत धर्माची पताका खांद्यावर मिरविणारे शिलेदार त्यामुळे घरात आपसुक संत साहित्याची ग्रंथसंपदा, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, एकनाथ महाराजांचं भागवत व ईतर अनेक संताची लेखनसंपदा. वडिलांनी कधीच हाता कानाला पकडून शिकवलं नाही परंतु कळत-नकळत या गोष्टी मनाच्या गाभाऱ्यात झिरपत गेल्या. माझ्याइतकं किर्तनं नक्कीच कोणी ऐकलेली नसतील. शालेय पाठ्य पुस्तकात असणारं मराठीचं पुस्तक फार आवडायचं विषेशतः पहिल्या पानावर असणारा लेखकाचा फोटो व त्यांची माहिती मनाला भुरळ घालायची शिवाय मराठी विषय शिकविण्यासाठी लाभलेली शिक्षक मंडळी देखील उच्च प्रतीची होती. ष आणि श चा उच्चार कसा करायचा किंवा ण आणि न याविषयी काटेकोर असणारे कुलकर्णी सर अथवा एका लयीत कविता म्हणणारे कोटलवार सर असोत. पुढे दहावी नंतर माझ्या शिक्षणाचा प्रवाह बदलला आणि अभ्यासक्रमातुन मराठी हा विषय गायब झाला मात्र वाचणाची सवय तसुबरदेखील कमी झाली नाही. सुरुवातीच्या काळात व्रतपत्र वाचण एवढच मर्यादित होतं पुढे ते मासिक वाचनापर्यंत आलं. लोकसत्ता, चित्र...

बातमी

बातमी !!!

डिप्लोमा झाल्यानंतर मी माझ्या गावाजवळील शहरात एका छोट्या कंपनीत सेल्स डिपार्टमेंट मध्ये नौकरीचा श्रीगणेशा केला.कंपनी छोटी असली तरी माझं काम मोठं होतं. कंपनीच्या कामानिमित्त मी महाराष्ट्रातीलच नव्हे तर अवघ्या भारतातील कंपन्यांना भेटी देत असे. लहान वर्कशॉप पासून ते थेट टाटा, बजाज, महिंद्रा सारख्या मोठ्या उद्योगांना वरचेवर जात असे. मशीनवर काम करणाऱ्या कामगारापासुन ते वातानुकूलित केबिनमध्ये बसणार्या साहेबांनी सोबत दिल्या संवाद साधत असे.
माझ्या समकालीन मित्रांनी पुण्या-मुंबईची वाट धरली होती बरीच जण परदेशवारीचे स्वप्न पहात होती.मी मात्र येथेच खुष होतो.या गोष्टीचं बर्याच मंडळींना आश्चर्य वाटत असे तर बरीचजण कुत्सितपणे चर्चा रंगवित. ते वयच असं होतं की मला माझी आई,माझं गाव व गावातील मित्र याविषयी अतुट ओढा होता. महिन्यातील किमान आठ-दहा दिवस गावी राहिल्याशिवाय मला करमत नसे.माझी आई वयाची साठी गाडीत होती शिवाय तिची इतर सात मुलं-मुली आपल्या आपल्या प्रपंचात गुंतलेली होती मीच एकटा सडा असल्यामुळें आई माझ्याशी संवाद साधायची.या नौकरी मुळे आईचा थोडाफार सहवास मला लाभला.एकंदरीत माझं मजेत चाललं होतं.

त्यावेळी माझ्या गावात क्रिकेटचं वारं एकदम जोरात होतं.अनेक क्रिकेट क्लब होती. सकाळ-संध्याकाळ अनेक मुले मैदानावर दिसत. मर्यादित संकटांचे सामने देखिल मोठ्या प्रमाणात व मोठ्या उत्साहात भरवली जात.
अमर क्रिकेट क्लब वा अन्य कोणत्यातरी क्लबने एकदा जय्यत तयारीत क्रिकेट सामने आखली होती.अनेक गावची नामांकित संघ सामिल होणार होती. नेमकं मी देखील त्यावेळी गावीच होतो. माझा एक गल्लीतला मित्र धावतच माझ्याकडे आला व माझ्यावर गुगली टाकीत म्हणाला,"आपण घ्यायचा का सहभाग?" क्रिकेटची आत्यंतिक आवड असणाऱ्या माझ्या मित्राने मैदानात जाऊन कधीही bat हातात धरलेली नव्हती. दुरदर्शनवर सामने पहाणे, सुनिल गावस्करचा कमालीचा तिटकारा व कपिलदेव वरती टोकाची श्रध्दा. आजच्या आधुनिक भक्त भाषेत कपिलभक्तच म्हणा....
अशा या मित्रांसमोर मी मात्र निरुत्तर झालो नसेल तरच नवल.
मी विषय टाळण्याचा प्रयत्न करीत होतो तो मात्र त्याच गोष्टीला चिकटून होता. शेवटी त्याच्या चिकाटीला दाद देत मी म्हटलं"अरे आपणाकडे क्रिकेट किट तर सोडाच साधी शुजा नाहीत प्रत्येकाच्या पायात रबरी चपला नाहीतर आपल्या स्लिपरा, कसं खेळणार आपण?" तो मात्र ऐकण्याच्या मुड मध्ये नव्हता. शेवटी त्यांच्या समाधानासाठी म्हणुन मी नाव नोंदविण्याचा ठिकाणी गेलो तेथिल सर्व मंडळी मला ओळखतच होती. ती देखिल खुष झाली. मी सांगीतलं नाव नोंदवितो मात्र आम्हाला सामन्या पुरतं का होईना क्रिकेट किट द्यावे लागेल. त्यांनी देखील विनाशर्त ही अट मान्य केली. गल्लीत येऊन आणखिन एक-दोघांशी चर्चा केली. सर्वांचच एकमत झालं सहभाग घ्यायचाच..जिंकु किंवा हारु. आता प्रश्न होता संघाच्या नावाचा, त्यावेळी वेस्टईंडिजचा संघ फार्मात होता. त्यांचा एक फलंदाज फारच आवडीचा होता.त्याची फलंदाजी पहाणे म्हणजे स्वर्ग सुखच. त्याचे नाव होते रिची रिचर्डसन. ठरले आमच्या संघाचे नाव *रिची क्रिकेट क्लब* रितसर जाऊन पैसे भरले व पावती घेतली. नाव तर नोंदवलं मात्र अकरा खेळांडुची भरती कांहीं केल्या होत नव्हती. काही मोठ्यांना देखिल भरती केल,पण जागा रिकाम्याच, ही बातमी गावात कशी पसरली कोण जाणे मात्र एक गोष्ट घडली ज्यांना इतर संघात जागा मिळाली नाही ते माझं घर शोधत येऊ लागलं,कोणी म्हणायचं,"नितीन मैत्री ओपनिंग बहुत अच्छा करता हुं"कोणाची फील्डिंग तर कोणाची गोलंदाजी..एक ना अनेक. एकदाचे कशीबशी अकरा नाव पक्की केली व सामन्याच्या दिवसांची वाट पहात बसलो.

आमचा पहीला सामना कंधार संघासोबत होता. अवघी गल्ली जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर उलटली होती. ठरल्याप्रमाणे आम्हाला संपूर्ण किटकॅट मिळालं. प्रतिस्पर्धी संघ जय्यत तयारीत होता.ड्रेस, शुजा एकदम टकाटक. आमच्याकडे ड्रेस तर सोडाच पायात देखिल चपलाच.
नाणेफेक झालं व आमच्याकडे प्रथम क्षेत्ररक्षण आले. अकरा खेळाडू सह आम्ही मैदानात उतरलो.प्रेक्षकांचा एकच जल्लोष. मला क्रिकेटच थोडंफार कळत असल्यामुळे मी फिल्डींगची आखणी केली.अगदी दर्डा म्यान ते घरी पर्यंत क्षेत्र रक्षक तैनात केले व चेंडु एका अनुभवी गोलंदाजाकडे दिला त्याचा पहीलाच चेंडु फलंदाजांच्या प्याड वर आदळला एक मोठी अपिल झाली,चेंडु थर्डम्यानच्या दिशेने गेला तेथील खेळाडुने तो अडविला मात्र तो चेंडुशिच खेळत बसला सर्वजण त्याला ओरडत होती चेंडु फेकण्यास सांगत होती तो मात्र ढ्ढिम.. फलंदाज धावा काढीतच होती. क्षणभराने त्यांच्या ध्यानात आलं तो धावतच अंपायर कडे गेला,"मला काय येडं समजलाव का?आऊट म्हणताव व रनाबी काढताव" आता माझ्या लक्षात आलं तो निवांत का होता, आमचं अपील त्याला आऊटच वाटत होतं. कसंबसं त्याला शांत केलं व खेळ सुरु केला. चपला शेजारी काढुन क्षेत्र रक्षण करणारे खेळाडू पासुन प्रेक्षक एकच गर्दा करीत होती. एकदाचा त्यांचा डाव संपला. आमच्या ओपनिंग जोडीने अतिशय सुंदर फलंदाजी करीत आम्हाला विजयासमिप नेले. उर्वरित पंधरा वीस रन मी क्रिकेट प्रेमी मित्राला सोबत घेऊन मी पुर्ण केले व आम्ही तो सामना अक्षरशः जिंकला.मैदानावर एकच जल्लोष.

संध्याकाळी आम्ही सर्व गल्लीत जमलो व तीच चर्चा करु लागलो इतक्यात कोणाच्यातरी सुपिक डोक्यातुन निघालं,"ही बातमी पेटलाय द्यायची का?"*नेकी और पुछ पुंछ* पुढील पाचच मिनिटांत माझ्या पुढ्यात कागद व पेन आला..मी बातमी व्यवस्थित ड्राफ्ट केली.

आता प्रश्न उरला ती पेपरात कशी
छापुन आणायची....
माझे एक चुलते होते. पत्रकारीतेत एक आदरणीय नाव. इंग्रजी विषयाचे उत्तम शिक्षक असुन देखील त्यांच्या मराठी लिखाणाला धार होती. भले भले राजकारणी त्यांच्या लिखाणाला टरकायचे. तेव्हा सर्वांमुखी पाहिलं नाव आलं काकांचं. तो कागद व दहा पंधरा मुलं घेऊन आमची स्वारी काकांच्या घरी दाखल झाली. नेहमी प्रमाणे काका अंगणात लोखंडी पलंग टाकुनी बसलेली होती बाजुने चार पाच खुर्च्या व काही माणसे. माझ्या स्वभावानुसार गेल्या बरोबरच मी मुळ विषयाला हात घातला,"काका, पेपरमध्ये बातमी द्यायची आहे" "कशाची?"इति काका. " आम्ही क्रिकेट चार सामना जिंकला"  काका  खोचक व मार्मिक बोलायचे,"
फाइनल जिंकलात का?"
"नाही" मी.
सेमि-फाईनल
नाही
मग
आजच सामने सुरु झाले आहेत व आम्ही साखळी सामन्यातील पहिला सामना जिंकलेला आहे.
काकांनी कपाळाला हात लावला व म्हणाले,"नित्या यांची बातमी कशी काय देता येईल? तुम्ही पहीला किंवा दुसरा या मी अवश्य बातमी देतो."
काही न बोलता तेथुन आम्ही काढता पाय घेतला. खरेतर आम्ही नाराज झालो होतो.
हार मानतिल ती मुलं कसली लगेचच कोणाच्या तरी एका पत्रकारांचे नाव आले. सामाजिक कार्यात अग्रणी असणारे हे नाव होते. क्षणाचा देखील विलंब करता आम्ही त्यांच्या कार्यालयात दाखल झालो. साहेब होतेच. मी सर्व इतिहास वृत्तांत एकविरा व आमची ही बातमी छापावी म्हणत आग्रह धरला. त्यांनी तो इतक्या गंभीरपणे एकदा किंवा उगीचच मी देखील गंभीर झालो. तितक्याच धीरगंभीर आवाजात ते बोलले,"नितीन कसं आहे कुत्रा माणसाला चावला तर बातमी होत नाही मात्र माणुस कुत्र्याला चावला तर ती बातमी होते." क्षणभर मला वाटलं बाहेर जावं व कुत्र्याचा लचका तोंडावा व यांच्या पुण्यात टाकावा...पण ते क्षणभरच....
रिकाम्या हाताने तेथुन आम्ही बाहेर पडलो. मी पुर्णपणे हार मानलेली होती. मित्र मात्र अशा ठेउन होते. यातच त्यांना एका दाम्पत्याचं नाव आठवलं.. प्राध्यापक असणारं हे दांपत्य फारच शिष्ट वाटायचे. तेव्हा तर मला ते पुणेकरच वाटायचे. थोड्याशा नाराजीनेच मी मित्रांच्या मागे गेलो. घरी मॅडम होत्या. मी पाठ झालेली स्क्रिप्ट ऐकविली. बाईंनी ती शांतपणाने ऐकली. सरतेशेवटी तेवढ्याच शांत स्वरात त्या बोलल्या,"येईल, कांहीं लिहिलेले आहे का?"घाईने मित्र खिशातील चुरगाळलेला कागद त्यांच्या हातात ठेवला त्यांनी तो पाहिला व आम्हास जाण्यास सांगीतले.
इतर मुले खुष होती, माझी मात्र खात्री होती बाईंनी पुणेकर पध्दतीने आम्हाला कटविले.

त्याकाळी आमच्याकडे *दै.लोकमत* या व्रत्तपत्राचा दबदबा होता. छपाई,कागद व रंगीत पुरवण्या या सर्वात नंबर एक. हल्लींच मला माहित नाही.
आपली बातमी पेपरात छापुन येईल हे मी पुर्णपणे विसरलो होतो.
मात्र पुढील रविवारी सकाळीच तो मित्र लोकमत घेउन माझ्याकडे धावतच आला,"नित्या आपली बातमी आली" आणि काय नवल लोकमतच्या क्रीडा पुरवणीत अगदी ठळकपणे रंगीत बातमी होती,*रिची क्रिकेट क्लब विजयी* बातमी लहानच पण सविस्तर अगदी माझ्या नावाची तर होती.

खरेतर अशा प्रकारची कात्रण काढावी,त्याचा छानसा अल्बम करावा व येणारया जाणार्यांना तो दाखवावा एवढा काटेकोरपणा व शिस्त माझ्यात काल नव्हती, आज नाही व उद्या देखील असणार नाही. एक मात्र खरे आहे या बातमीचा गंध माझ्या मनाच्या कुपीत अगदी ताजेपणा ने दरवळत रहाणार आहे.अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत...

.... नितीन वतनी, पुणे !!!!!!!!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अनुभव आणि आठवणी

अंतराळ

सुखाचा घास