पायाखालचं गाव
संत-उपकार
पंढरीचा विठोबा ही केवळ दगडात वसलेली मुर्ती नव्हे तर ते चराचरात वसलेलं चैतन्य रुप आहे. विठ्ठलाच्या दर्शनाने अतीव आनंद तर होतोच मात्र सामान्य मानवी जिवांचा उध्दारदेखिल होते.
विठ्ठल दर्शनाने संताना होणारा आनंद व त्यांनी व्यक्त केलेल्या भावना अलौकिक आहेत.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रुप पहाता लोचनी! सुख झाले हो साजणी हरीला पाहणे म्हणजे सोन्याचा दिवस अजी सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु! हरी पाहीला रे हरी पाहीला रेसरतेशेवटी काय, तो हा विठ्ठल बरवा! तो हा माधव बरवा!हे अनुभवण्यासाठी मात्र पुर्व जन्माची पुण्याई हवीच बहुत सुकृताची जोडी!म्हणुनी विठ्ठल आवडी!!
*तुकाराम महाराज* म्हणतात *आनंदाचे डोही आनंद तरंग!!*तर
*संत नामदेव महाराज*म्हणतात,*सुखाचे हे सुख श्रीहरी मुख! पहाता भुक तहान गेली!!*
*संत अमृतराय* म्हणतात
*अजी मी ब्रम्ह पाहिले! अगणित सुरगण वर्णिति ज्यासी कटीकर नटसम चरण विटेवरी!!*
*संत सेना महाराज*-
*जाता पंढरिसी सुख वाटे जीवा! आनंदे केशवा भेटताची!!*
या अनुभवासाठी आपणाला संत सहवास हवा.
*ज्ञानेश्वर महाराज* म्हणतात
*संताचे संगती मनोमार्ग गती! आकळावा श्रीपती येणे पंथे!!*
संताची संगत, त्यांचे ग्रंथ यामुळे मन निर्मळ आणि शुध्द होते. आणि मन निर्मळ झाले की ईश्वराची आवड उत्पन्न होते.
*तुकाराम महाराज* म्हणतात
*काय वानू मी या संताचे उपकार! मज निरंतर जागविती!!*
आपणाला निरंतर जागविण्याचे कार्य संत करीत असतात. त्यांचे उपकार म्हणुनच विसरायचे नसतात.
*रामकृष्ण हरी*
*नितीन कुलकर्णी, पुणे*
Comments
Post a Comment