पायाखालचं गाव

Image
*पायाखालचं गाव* मराठी भाषा, मराठी व्याकरण याची गोडी मला अगदी शालेय वयापासुन. आमचे वडील किर्तनकार, भागवत धर्माची पताका खांद्यावर मिरविणारे शिलेदार त्यामुळे घरात आपसुक संत साहित्याची ग्रंथसंपदा, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, एकनाथ महाराजांचं भागवत व ईतर अनेक संताची लेखनसंपदा. वडिलांनी कधीच हाता कानाला पकडून शिकवलं नाही परंतु कळत-नकळत या गोष्टी मनाच्या गाभाऱ्यात झिरपत गेल्या. माझ्याइतकं किर्तनं नक्कीच कोणी ऐकलेली नसतील. शालेय पाठ्य पुस्तकात असणारं मराठीचं पुस्तक फार आवडायचं विषेशतः पहिल्या पानावर असणारा लेखकाचा फोटो व त्यांची माहिती मनाला भुरळ घालायची शिवाय मराठी विषय शिकविण्यासाठी लाभलेली शिक्षक मंडळी देखील उच्च प्रतीची होती. ष आणि श चा उच्चार कसा करायचा किंवा ण आणि न याविषयी काटेकोर असणारे कुलकर्णी सर अथवा एका लयीत कविता म्हणणारे कोटलवार सर असोत. पुढे दहावी नंतर माझ्या शिक्षणाचा प्रवाह बदलला आणि अभ्यासक्रमातुन मराठी हा विषय गायब झाला मात्र वाचणाची सवय तसुबरदेखील कमी झाली नाही. सुरुवातीच्या काळात व्रतपत्र वाचण एवढच मर्यादित होतं पुढे ते मासिक वाचनापर्यंत आलं. लोकसत्ता, चित्र...

कोडं....

एक कोडं मह्या अजुन नाही उलगडलं
समद्यातलं समजतच कसं हो यांना समजतं
हे लेका़चे रईस,गाड्या-बंगल्यांचा यांच्याकडे ऊत
बोलण्यात यांच्या मात्र गरीबांच्या हिताच भुत
टीचभर खळगी भराया हातभर राबतो आम्ही
तेव्हा कोठे भेटते आम्हा कोरभर भाजी भाकरी
खाऊन खाऊन ढेरीचा घेर वाढलाय तुमच्या
आमची पोटं मात्र खपाटीला गेलेली
बडवा छात्या तुम्ही तुमच्या तकलादू देशप्रेमाच्या
ढोल ताशे तुतार्या अन् पिपाण्या समाजसेवेच्या
होऊ द्या चर्चा तुमच्या नसलेल्या प्रामाणिकतेच्या
काळ्या मातीशी ईमान राखीत राबराब राबतो आम्ही
काळ्या मातीतुनच सोनं उगवतो आम्ही
नफ्यापेक्षा जादा तोटाच सहन करतो आम्ही
आमच्या टाळुवरचं लोणं ढापणार्या गिधाडांनो
नका लावू आमच्या अस्मितेची बोली
आमच्या अस्मितेचा सुर्य उगवायचा अजुन बाकी आहे
उगवल्यानंतर मात्र तुमची दाणादाण निश्चित आहे...
नितीन कुलकर्णी, पुणे

Comments

Popular posts from this blog

अनुभव आणि आठवणी

अंतराळ

सुखाचा घास