पायाखालचं गाव

Image
*पायाखालचं गाव* मराठी भाषा, मराठी व्याकरण याची गोडी मला अगदी शालेय वयापासुन. आमचे वडील किर्तनकार, भागवत धर्माची पताका खांद्यावर मिरविणारे शिलेदार त्यामुळे घरात आपसुक संत साहित्याची ग्रंथसंपदा, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, एकनाथ महाराजांचं भागवत व ईतर अनेक संताची लेखनसंपदा. वडिलांनी कधीच हाता कानाला पकडून शिकवलं नाही परंतु कळत-नकळत या गोष्टी मनाच्या गाभाऱ्यात झिरपत गेल्या. माझ्याइतकं किर्तनं नक्कीच कोणी ऐकलेली नसतील. शालेय पाठ्य पुस्तकात असणारं मराठीचं पुस्तक फार आवडायचं विषेशतः पहिल्या पानावर असणारा लेखकाचा फोटो व त्यांची माहिती मनाला भुरळ घालायची शिवाय मराठी विषय शिकविण्यासाठी लाभलेली शिक्षक मंडळी देखील उच्च प्रतीची होती. ष आणि श चा उच्चार कसा करायचा किंवा ण आणि न याविषयी काटेकोर असणारे कुलकर्णी सर अथवा एका लयीत कविता म्हणणारे कोटलवार सर असोत. पुढे दहावी नंतर माझ्या शिक्षणाचा प्रवाह बदलला आणि अभ्यासक्रमातुन मराठी हा विषय गायब झाला मात्र वाचणाची सवय तसुबरदेखील कमी झाली नाही. सुरुवातीच्या काळात व्रतपत्र वाचण एवढच मर्यादित होतं पुढे ते मासिक वाचनापर्यंत आलं. लोकसत्ता, चित्र...

वाडा गढीचा....

परवा ऐन दिवाळीत ईतरांची घरे दिव्याच्या प्रकाशात
उजळत असताना अंधार अंगावर घेतलेला एक वाडा
चक्क माझ्याशी बोलु लागला,"आलास, बरं केलास"
अंधारात चाचपडणार्या मला कोणीतरी भेटण्यास आले
आठवतय मला तु येणार म्हणजे कीती लगबग असायची वाड्यावरती, चार-पाच गडी माणसं तर आधीच उभी टाकायची मारुतीच्या पारालगत तुझ्या ब्यागा घेण्यासाठी तुझी सरबराई करण्यासाठी अख्खा वाडा झटायचा..माहीत आहे मला आज कोणी सुध्दा नसणार..नाराज होउ नकोस..सरणार्या काळात अनेक गोष्टी विसराव्याच लागतात....
तुला म्हणुन सांगतो, पाच बुरजं, दिंडी दरवाजा आणि मजबुत दगडी खांबात अगदी ऐटीत गावाच्या अगदी प्रवेशद्वारावरतीच मी उभा आहे..नाही म्हटलं तरी मला माज होताच आपल्या रुपाचा, उंचावरुन गावची लगबग पहाताना मजा वाटायची...
नवीन लग्न होउन लाजत वाड्यात येणार्या नवललना पासुन ते जख्ख म्हातार्या आजीबाईचा आवाज मी ऐकलेला आहे. कीती जन्म आणि मृत्यू पाहीले याचा हिशोबच नाही....
गुरे-ढोरे, गडी माणसं, सणवारं, सुख-दु:ख अंगाखांद्यावर घेत मी सर्वांना न्याहाळत होतो
नवजात शिशुचं रडणं जेवढं मला आवडायचं...नवीन लग्न झालेल्या जोडप्याची कुजबुज अन् बांगडीचा आवाज मला मंत्रमुग्ध करायचा..एक पिढी झाली की दुसरी, दुसरी की तिसरी हे ऋतुचक्र सुरुच असायचंच मी मात्र आहे तसाच डौलात उभा...
पण खरं सांगु मी सुध्दा आतुन खचत होतो..पोखरत होतो..कीड लागलेल्या लाकडागत..माझं दुःख समजुन घेणारं इथं कोणीच नव्हतं..मी जुना झालोय.. जीर्ण झालोय एवढच यांच पालुपद. एक सांगतो बाळ, मला देखिल वीट आलाय माझा..माझ्यावर जीव लावणारे एक एक जग सोडीत होती आणि नवीन पिढीच तर विचारुच नको ती माझ्याजवळ रहायलाच तयार नाही
उरलासुरला माझा आधार परवा उन्मळून पडला माझ्याशिवाय राहु न शकणारी बाई मला सोडुन गेली..अगदी कोवळ्या वयात आली होती रे वाड्यात.अनेक सुख-दु:ख,उन-पावसाळे पहात ती ताठ मानेने उभी होती आणि मी देखील......
तिच्या जाण्याने मात्र मी गळाटुनच गेलो...ते पहा मी ढासाळतो आहे...कोसळतो आहे...खिळखिळा झालो आहे...उद्या राक्षसागत यंत्र येथे येतील...मला भुईसपाट केले जाईल...अगदी टकाटक..नवीन पिढी...नवे विचार... सर्व काही नवे..नवे...
जा बाळा, नको करु तु विचार माझा..मी कोठेही असलो तरी माझा तुम्हा हात तुमच्या शिरावरती कायमच आहे...
एक वचन मात्र मला दे" इकडे आलास म्हणजे या दिडावरती मी असेपर्यंत तरी दोन अश्रु नक्की गाळ तेवढाच मला ओलावा...मायेचा. ..
नितीन कुलकर्णी, पुणे

Comments

Popular posts from this blog

अनुभव आणि आठवणी

अंतराळ

सुखाचा घास