*मित्रांनो*..... *रामराम*
उद्या ८ नोव्हेंबर, बरोबर एक वर्षापूर्वी देशात नोटबंदीचा निर्णय झाला आणि दुसर्या दिवसांपासून ची अवस्था फारच मनोरंजक व गंमतशीर होती. पैसे असणारे व नसणारे दोन्ही वर्ग परेशान होती बँकसमोर व एटीमसमोर हे रांगाच्या रांगा. बर्याच लोकांची तर रांगा लावणे हीच एक दिनचर्या झाली होती. त्या काळातल्या अनेक गमतीजमती सांगता येतील मात्र आजचा तो विषय नाही
नोटबंदीच्या दोन-तीन दिवसानंतर मी कंपनी कामानिमित्त चाकणला निघालो. धायरीतुन आमची दुचाकी सिंहगडरोड-राजाराम पुल-कर्वे रोड-भांडारकर रोड-फर्गुसन रोड करतकरत वाकडेवाडीच्या पुलाखालून जुना मुंबई हायवेला लागली. नाशिक फाट्यावरुन भोसरी, मोशी करत आम्ही दिमाखात निघालो होतो. तंबाखु खाऊन आपल्या दुचाकीवरून मागच्याचा विचार न करता पिचकारी मारणारे महाभाग, विरुद्ध दिशेने बेदरकारपणे आपली वहाणे दामटणारी शुरवीर, सिग्नल तोडणे हेच आपले कार्य आहे असे माननारा आदरणीय वर्ग..एक ना अनेक गोष्टी न्याहाळीत आम्ही चाकणाचा चौक केव्हा पार केला ते आमचे आम्हालाच समजले नाही. चाकण- महाळुंगे रस्त्यावर इले्क्ट्रो मेक कंपनीच्या पुढे आमची गाडी गेली आणि आमच्या स्प्लेंड्रोबाने दगा दिला, गाडीची क्लच वायर तुटुन पडली. ब्रेक वायर तुटली असतीतर गाडी कशीबशी चालवता असती मात्र क्लच वायरच तुटल्यामुळे गाडी ढकलण्याशिवाय पर्यायच नव्हता. नेमकं चुकीचा सल्ला देणार्यास आम्ही ग्यारेजचा पत्ता विचारला व आमची स्वारी विरुध्द दिशेने निघाली एव्हाना सुर्य माथ्यावर आलाच होता. घरुन निघताना आमच्या खिशात पाचशेची एक नोट व बँकेची कार्ड होती. आम्हाला काडी-बिडी,तंबाखु,चहा,सिगारेट यापैकी कशाचच व्यसन नसल्यामुळे आम्हाला पैशाची तशी आवश्यकता भासतच नाही. गाडी ढकलत आम्ही एका ग्यारेजवर पोंहचलो तेथील मुलाने क्लचवायर बसवावी लागेल व शंभर रु. खर्च येईल असे सांगीतले.. कार्ड चालण्याचा प्रश्नच नव्हता, पाचशेची नोट पाहुन तो दचकलाच. आमचा नाईलाज झाला. काही न बोलता आम्ही पुढे कुच केले. एक- दोन ठिकाणी तोच अनुभव आल्यानंतर आम्ही गळाटुनच गेलो. जवळजवळ आम्ही चाकणच्या मुख्य सिग्नलपर्यंत पोंहचलो होतो. तेथेच झाडाखाली एक ग्यारेज दिसले. खुर्चीवरती निवांत बसलो, त्याला आमची अडचण न सांगताच वायर बसविण्यास सांगीतले. त्यानेही झटपट काम केले व शंभर रुपये देण्यास सांगीतले. आमचा मित्र *जिवन कुलकर्णी* एका कंपनीत होता. त्याला फोन केला, अडचण सांगितली, शंभर रुपये आणण्यास सांगीतले. पाच मिनिटांत तो आला व काम झाले. दरम्यानच्या काळात खिशातील पाचशेची नोट बाहेर काढली की आम्हाला उगीचच ती आमच्या आधीच काळे असणार्या व पायपीटीने अधिकच काळवंडलेल्या चेहर्याकडे हतबलतेने पहात आहे व काहीतरी बोलु पहाते...
आमच्यातल्या टीनपाट कवीची प्रतिभा जागृत झाली नसेलतर नवलच..
तोडक्या मोडक्या शब्दात ती आम्ही मांडीत आहोत. आवडलीतर सांगा....
*पाचशेची नोट*
काल खिशात असणारी एक
पाचशे रुपयाची नोट
उगीचच मला खजिल
भासत होती...
दहा ठिकाणी होणारी माझी
पायपीट पाहुन
आतल्याआत स्फुंदत होती
धन्याच्या कामी आता
येणार नाही म्हणत
आदळआपट करीत होती..
माझ्यापेक्षा शंभर-पन्नसची
असतीतर तुझं भागलं तरी
असतं असं कुरकुरत होती
मला मात्र सहजच संतविचार
स्पर्शुन गेला...
लहानपण देगा देवा
*नितीन कुलकर्णी* पुणे
सुंदर कविता
ReplyDeleteThanks doctor
ReplyDeleteThanks doctor
ReplyDeleteछान
ReplyDeleteछान
ReplyDelete